ऊर्जा स्त्रोतांचे संवर्धन पर्यावरण पूरक जीवनशैली कार्यशाळा

Home > Events > Categories > Event > ऊर्जा स्त्रोतांचे संवर्धन पर्यावरण पूरक जीवनशैली कार्यशाळा

नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे

नवजीवन लॉ कॉलेज

शिवशक्ती चौक, सिडको, नाशिक४२२००८

तारीख: 17/05/2023

ऊर्जा स्त्रोतांचे संवर्धन पर्यावरण पूरक जीवनशैली कार्यशाळा 

नवजीवन विधी महाविद्यालयात दिनांक 17/05/2023 रोजी ऊर्जा स्त्रोतांचे संवर्धन पर्यावरण पूरक जीवनशैली ( Workshop on Energy Transition Working Group under G20 ) या विषयांची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या  अध्यक्षस्थानी माननीय प्राचार्या डॉ. शाहिस्ता इनामदार होत्या. तर प्रमुख पाहुणे  म्हणून डॉ. मुग्धा सापटनीकर मॅडम होत्या. मार्गदर्शक म्हणून दैनिक पुढारीचे वरिष्ठ उपसंपादक श्री जिजा दवंडे यांनी ऊर्जा स्त्रोतांचे संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने ग्रामीण भागात विजेअभावी होणारी शेतकरी वर्गाची गैरसोय, वाढती लोकसंख्या तसेच वाढत्या विजेच्या मागणीमुळे वाढलेला तुटवडा याबाबत जागृत होऊन ऊर्जेचे संवर्धन करण्यासाठीचे आव्हान केले. तसेच प्रमुख पाहुण्या डॉ. सापटनीकर मॅडम यांनी G-20 अंतर्गत होणाऱ्या बैठकीचे उद्देश , हेतू आणि विद्यार्थ्यांवर असलेली जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येकाने देशाचे ऊर्जा स्त्रोत जतन करण्यासोबत पर्यावरणाच्या संवर्धन करण्याच्या दृष्टीने काम करण्याचे आवाहन केले प्राचार्या डॉ. शाहिस्ता इनामदार यांनी प्रास्ताविकात ऊर्जा स्त्रोत जतन करण्याची प्रत्येकाची जबाबदारी असून ऊर्जा संवर्धनासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे तसेच विद्यार्थ्यांनी समाजात याबाबत जागृती निर्माण करण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. डॉ शालिनी पेखळे-घुमरे यांनी ऊर्जा संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार मानले . कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.