SWO
नवजीवन कायदा महाविद्यालय, नाशिक
डॉ. शाहिस्ता सलिमखान ईनामदार, विद्यार्थी विकास अधिकारी
नवजीवन कायदा महाविद्यालयातर्फे डॉक्टर शाहिस्ता सलीमखान ईनामदार यांची विद्यार्थी विकास अधिकारी(SDO)म्हणून नियुक्ती करण्यात आली.त्यांनी विद्यार्थी विकास मंडळाच्या नियुक्ती झाल्यानंतर अनेक उपक्रम राबविले.
2019 मधील पावसाळ्यात नियोजित वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थी विकास मंडळातर्फे वृक्षलागवडीच्या उपक्रमांतर्गत नवजीवन विधि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 50 झाडे लावली. त्यामध्ये आंब्याची झाडे, चिंच, पिंपळ, जांभूळ या सारख्या झाडांचीलागवड करण्यात आली. सदर झाडे सिन्नर व महाविद्यालय परिसरात लावण्यात आले. तसेच महाविद्यालय विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दरवर्षी एक झाड लावण्याची प्रतिज्ञा घेतली.तसेच पाणी आडवा, पाणी जिरवा उप्रकम राबविण्यात आला.
‘पाणी आडवा,पाणी जिरवा पाणी वाचवा’ हा संदेश देण्याकरिता महाविद्याल्यातूनच सुरुवात करण्यात आली. त्याकरिता दोन मोठे ड्रम वापरून पावसाचे पाणी साठवण (Rain Water Harvesting)करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदव्युत्तर विभागातील काही विद्यार्थी एकत्र येऊन “यंगइंडिया फाउंडेशन” च्या माध्यमातून “Rakhi for Nation”हा उपक्रम राबवितलाSDOडॉ.ईनामदार यांच्या मार्गदर्शनाखालीराबविण्यात आला. विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने राखीतयार केली तसेच सीमेवरील जवान साठी मनोगत पत्र देखीललिहिले.
महाविद्यालयात स्वच्छता पंधर्वडा साजरा करण्यात आला. देशाची प्रतिमा, आदर आणि प्रतिष्ठा तसेच प्रत्येक नागरिकाच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी पायाभूत सुविधांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी संपूर्ण देशाबरोबर महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी सदर कार्यक्रमात सहभागी झाले होते.“स्वच्छ भारत मिशन”अंतर्गत नवजीवन विधि महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपले योगदान या कार्यक्रमासाठी दिले.महाविद्यालय परिसर तसेच सी.बी.एस.परिसराची साफ-सफाई करण्यात आली.सार्वजनिक स्वच्छता,नदी स्वच्छता, वृक्षसंवर्धन, प्लास्टिकचा पुनर्वापर, अशा विविध विषयांवर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे व नागरिकांमध्येजनजागृती करण्यात आली. मिशन “स्वच्छ भारत” करण्याची सर्वांनी शपथ घेतली
महाविद्यालयात दिनांक 19 ऑक्टोबर 2019 रोजी इलेक्ट्रॉनिक सिगारेट बंदी बाबत उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत इलेक्ट्रॉनिक सिगारेट बद्दल माहिती देण्यात आली व सिगारेट आरोग्यास कशीहानीकारक आहे. याबद्दल माहिती देण्यात आली.इलेक्ट्रॉनिक सिगारेट बंद व्हावी म्हणून शिक्षक व विद्यार्थी यांनी प्रतिज्ञा घेतली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामान्य नागरिकांसाठी पथनाट्य सादर करून जनजागृती घडवून आणली.
दिनांक 24 ऑक्टोबर 2019 रोजी ‘प्रोफेश्नल ईथीक्स’ या विषयवार विशेष अतिथी व्याख्यानमाला महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमास महाराष्ट्र व गोवा ‘बार काउन्स्ल’ चे चेअरमन अँडव्होकेट श्री. अविनाश भिडे हे प्रमुख वत्क्ते म्हणून उपस्थित होते.
दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोजी महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.SDO डॉ.ईनामदार यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिन व त्याचे महत्त्व याबद्दल माहिती दिली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुन्देन्दु कुमार देव यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. संविधानामधील प्रस्तावनेची सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच संविधान जनजागृती वर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
3 डिसेंबर 2019रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगानकरिता संस्कृतीत, क्रीडा साहित्य असे विविध उपक्रम देण्यात आले. सदर कार्यक्रमात नवजीवन विधी महाविद्यालय बरोबरच के.टी.एच.एम. महाविद्यालयाचाही सहभाग होता.यात नवजीवन महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच SDOडॉ. ईनामदार यांनीही आपला सहभाग नोंदविला.
दिनांक 21 जानेवारी 2020 ते २३ जानेवारी 2020 दरम्यान के.एस.के.डब्ल्यू. महाविद्यालय, नाशिक आयोजित केलेल्या “निर्भय कन्या”अभियान कार्यक्रमात डॉ. ईनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली नवजीवन महाविद्यालयाच्या 18 विद्यार्थ्यांनींनीआपला सहभाग नोंदवला.
SDO डॉ. ईनामदार यांनी ही एस.व्ही.के.टी. महाविद्यालय, देवळाली कॅम्प व पी.व्ही.जी. महाविद्यालय, मेरी येथे रिसोर्स पर्सन म्हणून “निर्भय कन्या”अभियान कार्यक्रमातविध्यार्थिनींचे मार्गदर्शन केले.
महाविद्यालयात नेताजी शुभाश्चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. नेताजींचा जीवन प्रवास, त्यांनी आपल्या मातृभूमी साठी दिलेले योगदान, त्यांचा स्वातंत्र्य लढा ई. आठवणींना त्यावेळीउजाळा देण्यात आला.
3 फेब्रुवारी 2020 रोजी के.एस.के.डब्ल्यू.महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिरात नवजीवन विधी महाविद्यालयाच्या ०६ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्रिंगलवाडी किल्ला, इगतपुरी येथे हे गिर्यारोहण शिबिरात आयोजित केले होते.
महाविद्यालयात व सिन्नर परिसरात लागवड केलेल्या झाडांना पाणी देऊन त्यांचीपुनरपाहणी करण्यात आली.
दिनांक 27 फेब्रुवारी 2020 रोजी नवजीवन विधी महाविद्यालयात “मातृभाषा गौरव दिन”, साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मातृभाषेबद्दल विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कुसुमाग्रजांची कविता प्रस्तुत करण्यात आली.विद्यार्थ्यांनी आप-आपल्या मातृभाषेत कविता / भाषण केले.
“मराठी भाषा संवर्धन पंधर्वडा” दरम्यान , ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपिठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘मराठी भाषा गौरव दिन/ दिवस साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. देव, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतेतसेचएल.एल. बी. – प्रथम, द्वितीय, तृतियाव बी. ए. एल. एल. बी वर्गांचे विद्यार्थी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित होते.
प्राध्यापिका डॉ. शाहिस्ता ईनामदार(SWO) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.तद्नंतरखालील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
- श्रीमती. रझिया कुरेशी.
- कु. अस्मिता रुपवते(एल. एल. बी. प्रथम) या विद्यार्थिनीनेकविता सादर केली.
प्राध्यापक श्री. कामासाई यांनी मराठी भाषेविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कुन्देन्दुकुमार देव यांचे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे महत्त्व. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले.SWOश्रीम.ईनामदारयांनी कार्यक्रमासाठी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वृंद, शिक्षकेतरकर्मचारी, विधार्थी वनवजीवन एज्युकेशन सोसायटी यांचे आभारव्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कुन्देन्दुकुमार देवयांच्या परवानगीने मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाच्या सांगतेची घोषणा करण्यात आली.
दिनांक ०४ मार्च 2020 रोजी सॅनेटरी नॅप्किन वेल्डिंग मशीन (डिस्पोजेबल मशीन) राज्यातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून तसेच सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन मशीन बसविणे व स्वच्छता राखण्याबाबत कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. तसेच वरील नमूद मशीन निरंतर चालू स्थितीत राहतील याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कोरोनाविषाणू(COVID-19) प्रादुर्भावाचा, सार्वत्रिक संकटाचा (Pandemic) सामना करताना महाविद्यालय, विद्यार्थी विकास मंडळ आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत.डॉ. शाहिस्ता ईनामदार यांच्या मार्गदर्शनाखालीकोरोनामुक्ती जनजागृती अभियानांतर्गत – फेस मास चे उत्पादन केले व त्यांचे निशुल्क वितरण करण्यात आले. कोरोना विषाणूबद्दल नागरिकांमधील भीती कमी करण्यात साठी त्यांचे प्रबोधन करण्यात आले. तसेच धान्य वाटप, औषधेचे निशुल्क वाटण्यात आले.
याव्यतिरिक्तही विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी,डॉ.शाहिस्ता ईनामदार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम वर्षभरात राबवले–
- “सायबर क्राईम” या विषयावर महाविद्यालात कार्यशाळा आयोजित करून. इंटरनेटच्या माध्यमातून होणारी फसवणूक कश्या प्रकारे होते, त्यापासून कसे सावध रहावे. या गोष्टी विषयी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना माहिती देऊन त्यांचे प्रभोदन करण्यात आले.
- फॉरेन्सिक डिपार्टमेंट, मेरी येथे विद्यार्थ्यांना भेट देण्याची संधी उपलब्ध करूनदेण्यात आली. सदर भेटी दरम्यान फॉरेन्सिक विभागातील विविध शाखा कोणत्या / किती आहेत, तेथील चालणारे कामकाज, त्याचा न्याय व्यवस्थेस होणारा उपयोग ई. बाबींची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
- बॉम्बे व गोवा हायकोर्ट येथे विद्यार्थ्यांची भेट बॉम्बे व बॉम्बे व गोवा हायकोर्टाची आयोजित करण्यात आली होती. सदर भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना कोर्टाचे कार्यपद्धतीबद्दल माहिती करून देण्यात आली.
कोरोना काळातील काम
डॉ. शाहिस्ता सलिमखान ईनामदार, विद्यार्थ्यां विकास अधिकारी
कोरोनाच्याकठीण काळात डॉ. शाहिस्ता सलिमखानईनामदार यांनीनवजीवनविधि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या बरोबरच इतर महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक यांच्यामध्ये covid-19 विषयी जनजागृती निर्माण करण्याकरिता प्रश्नोत्तरी स्वरूपात गुगल फॉर्म तयार करून व व्हिडिओद्वारे कोरोना काळात काय करावे, काय करू नये तसेच या दरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने उपक्रम राबविला. सर्व सहभागी झालेल्या व्यक्तींना प्रमाणपत्र (Online)देण्यात आले.हाउपक्रममहाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक यांच्यापुरताच मर्यादित न ठेवता इतरही सामान्यव्यक्तींसाठी खुला ठेवण्यात आला होता. तसेच नाशिक किंवा महाराष्ट्र व आपल्या देशा मध्येच सदर उपक्रमाची लिंक मर्यादित न ठेवता इतरही देशातील व्यक्तींपर्यंत ती पोहोचवली आणि त्यांनी सहभागी करून घेतले.
जनजागृती करताकरता त्यांनी गरजू व्यक्तींना अन्नधान्य औषधे पाणी तसेच इतर गरजेच्या वस्तूंचे त्यांचे निशुल्क वितरण करण्यात आले व फेस मास चे उत्पादन केले तेही वाटण्यात आले.इतर राज्यातील मजूर जे महाराष्ट्रातून आप-आपल्या राज्यात परतीचा प्रवास करत होते त्यांनाही वरील नमूद गरजेच्या वस्तूंचे / धान्य / औषधेई. चे वाटप करण्यात आले.
हे सर्व करीत असताना त्या स्वतःही कोरोनापॉझिटिव्ह झाल्या. असे असतानाही त्यांनी आपले प्रबोधनात्मक कार्य व्हर्च्युअल रित्या (ऑनलाइन) सुरूच ठेवले. Covid-19 पॉझिटिव्हअसूनही त्यांनी प्रबोधनाचे कार्यन थांबविता विविध माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.